बाजार समिती उपसभापती आणि विवाद समिती अध्यक्ष चौकशीच्या फेऱ्यात

बाजार समिती उपसभापती आणि विवाद समिती अध्यक्ष चौकशीच्या फेऱ्यात

Published on

शेतमाल थकबाकी तक्रारीची दखल
बाजार समिती उपसभापती आणि विवाद समिती अध्यक्ष चौकशीच्या फेऱ्यात


जुईनगर, ता. २७ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि विवाद समिती अध्यक्ष हुकूमचंद आमधारे चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. याबाबत त्यांना पणन कार्यालय पुणे यांच्या तर्फे मंगळवारी (ता. २५) ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे. शेतीमाल थकबाकी तक्रार पणन कार्यालयाला ३० सप्टेंबरला प्राप्त झाली होती. याबाबतचा चौकशी अधिकारी यांचा अहवाल कार्यालयास सोमवारी (ता. २४) प्राप्त झाला. त्याअनुषंगाने ही नोटीस देण्यात आली आहे.
ही कारवाई शेतकरी बाळासाहेब जगन्नाथ झांबरे यांनी केलेल्या शेतमाल थकबाकी तक्रारीच्या अनुषंगाने पणन संचालकांच्या कारवाईचा प्राथमिक भाग आहे. शेतकऱ्याच्या या तक्रारीनंतर पणन संचालकांनी या प्रकरणात चौकशी अधिकारी नंदकुमार दाणेज यांची नेमणूक केली होती. चौकशीत हुकूमचंद आमधारे यांनी कायद्याचे व न्यायालयीन बाबींचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
बाजार समिती सचिवांच्या अनुपस्थित सभा घेणे, मे आणि जुलै महिन्यात नियमबाह्य सभा लावणे, संबंधित प्रकरणावर निर्णय घेण्यास विलंब करणे, न्यायालयाच्या विरुद्ध आदेश निर्गमित करणे, डिसीबी बँकेने केलेल्या लिलावात त्रुटी असणे, अशा विविध विषयांना अनुसरून तसेच पदाच्या शक्तीचा वापर, कर्तव्यात कसूर आणि अधिकाराचा दुरुपयोग दिसून आल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. तर गुरुवारी (ता. २७) लेखी किंवा तोंडी म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले होते.
१) विवाद उपसमितीमध्ये कायदेशीर गणपूर्ती न पाळणे
• कलम १०(३) नुसार किमान तीन सदस्यांची कोरम आवश्यक
• झालेल्या सभांमध्ये कोरम नव्हती
• बाजार समितीचे तत्कालीन सचिव खंडागळे सर्वच सभांना अनुपस्थित
• हे थेट कायद्याचे उल्लंघन

बंद नस्ती पुन्हा उघडणे -
• ५ मे २०२५ रोजीची नस्ती बंद दाखवूनही २८ मे व १ जुलै २०२५ रोजी पुन्हा सभा घेण्यात आल्या.

फळ मार्केटमधील ‘एन-९१४’ गाळ्याच्या व्यवहारात मोठा प्रशासकीय घोळ
• डीसीबी बँकेने केलेला अनधिकृत लिलाव
• बाजार समितीची पूर्वपरवानगी नसताना मालकी हक्क प्रमाणपत्र देण्याची चूक
• बाजार समितीचे थेट आर्थिक नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com