राणीच्या बागेत पहिल्यांदाच कला प्रदर्शनाचे आयोजन

राणीच्या बागेत पहिल्यांदाच कला प्रदर्शनाचे आयोजन

Published on

राणीच्या बागेत पहिल्यांदाच कला प्रदर्शनाचे आयोजन
निसर्गसौंदर्याचे अभ्यासक, कलाकारांना संधी
कांदिवली, ता. २७ (बातमीदार) ः भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिका वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान हे प्रदर्शन होणार आहे.
मुंबईकरांसाठी हे प्रदर्शन म्हणजे निसर्ग आणि कलेचा एकत्र उत्सव ठरणार आहे. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपआयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. ‘बोन्साय’ या लघुवृक्ष संवर्धन कलेसोबतच ‘ओरिगामी’ म्हणजेच कागदाच्या घड्या घालून नवनवीन कलाकृती साकारण्याची पारंपरिक जपानी कला या प्रदर्शनात अनुभवता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com