हत्या की आत्महत्या हे निश्चित करा

हत्या की आत्महत्या हे निश्चित करा

Published on

हत्या की आत्महत्या, हे निश्चित करा

दिशा सालियनप्रकरणी न्यायालयाचे सरकारला आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूची मुंबई पोलिस आणखी किती काळ चौकशी करणार? दिशाच्या मृत्यूला पाच वर्षे उलटली आहेत. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण आत्महत्या की हत्येचे हे निश्चत करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २७) राज्य सरकारला दिले. 
मालाड येथील इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून दिशाचा ८ जून २०२०ला मृत्यू झाला होता. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. दिशाच्या मृत्यूमागील सर्व शक्यतांची बारकाईने चौकशी सुरू असल्याचे सरकारी वकील मनकुंवर देशमुख यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर पोलिसांनी दिशाच्या वडिलांसह आईचाही अनेक वेळा जबाब नोंदवला आहे. प्रत्येक वेळी दोघांनीही त्यांना कोणावरही संशय नसल्याचे सांगितले होते. आता पाच वर्षांनंतर दिशा हिचे वडील सतीश सालियन हे तिच्या मृत्यूबाबत न्यायालयात धाव घेऊन शंका उपस्थित करत असल्यावरही देशमुख यांनी युक्तिवाद करताना प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर अजून चौकशी कशासाठी? एका व्यक्तीचा मृत्यू हाेऊन पाच वर्षे उलटली आहेत. त्यामुळे पोलिसांना ही आत्महत्या आहे की हत्या, हे आणखी किती तपासायचे आहे, अशी विचारणा न्या. अजय गडकरी आणि न्या. रणजित भोसले यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला केली.
--------
कागदपत्रे मिळण्याचा अधिकार!
पोलिस याचिकाकर्त्यांना त्यांच्या जबाबांच्या प्रती आणि कायद्यानुसार परवानगी असलेली तपासाशी संबंधित कागदपत्रे का देत नाहीत, असा प्रश्न न्यायालयाने सरकारी वकिलांना केला. याचिकाकर्ते मृत व्यक्तीचे वडील आहेत आणि त्यामुळेच परवानगी असलेली कोणतीही कागदपत्रे मिळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याला संबंधित कागदपत्रे उपलब्ध करणार की नाही, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आणि दिशाचा शवविच्छेदन अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारला देऊन न्यायालयाने सुनावणी ११ डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com