आज त्रिभाषा समितीची मुंबईत बैठक मुंबईतील शाळा शिक्षक,मुख्याध्यापकांना उपस्थितीची सक्ती,
आज त्रिभाषा समितीची बैठक
शाळांना सक्ती; लोकप्रतिनिधींची पाठ
मुंबई, ता. २७ : राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती शुक्रवारी (ता. २८) मुंबईकरांची भेट घेणार आहे.
या भेटीसाठी शालेय शिक्षण विभागातील शिक्षण उपसंचालक कार्यालयांअंतर्गत येणारे तीन विभाग, महापालिका शिक्षण विभागासह मुंबईतील शिक्षक, मुख्याध्यापकांसह इतर अधिकाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे. दुसरीकडे मुंबईतील सर्व सहा खासदारांसह ३६ आमदारांनाही निमंत्रण पाठविण्यात आले असले, तरी समितीला त्यांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. केवळ मनसे, शिवसेना अशा पक्षांचे काही पदाधिकारी समितीला भेट देणार असल्याने मुंबईतील समितीची ही बैठक मुंबईतील मोठ्या राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रतिसादाविना होणार असल्याचे दिसते. ही बैठक यशस्वी व्हावी म्हणून शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मुंबईतील शिक्षक, मुख्याध्यापकांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेशच जारी केले आहेत. ही बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. या भेटीदरम्यान जाधव समिती सामान्य नागरिक, भाषातज्ज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संबंधित तसेच लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आंदोलनकर्ते आदींबरोबर संवाद साधतील. दरम्यान, दुपारी ३ ते ५ वाजता ऑनलाइन व्हीसीद्वारे ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील नागरिकांसोबत संवाद साधला जाणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली.
...
मतावलीसाठी लिंक उपलब्ध
डॉ. जाधव समितीकडून मुंबईतील भेटीसाठी प्रश्नावली व मतावली तयार करण्यात आली आहे. ही प्रश्नावली व मतावली http://tribhashasamiti.mahait.org या लिंकवर उपलब्ध असल्याची मााहिती विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी दिली.
...
विरोधाचे पुस्तक राज्यपालांकडे
डॉ. जाधव समिती नकोच, असे म्हणत मराठी अभ्यास केंद्राने ‘पहिलीपासून हिंदी/त्रिभाषा सक्तीचे महाराष्ट्रद्रोही राजकारण (२०२५)’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले असून, हे पुस्तक राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे, उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत आणि महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांना त्यांच्या कार्यालयात पोहोचवले असून, आपला जाधव समितीला विरोध असल्याचे मराठी अभ्यास केंद्राचे सुशील शेजुळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

