शहापूर पोलीसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या
हत्येप्रकरणी तिघांना अटक
शहापूर, ता. २७ (वार्ताहर) : मुंबई-नाशिक महामार्गावरील चेरपोली गावाच्या हद्दीत तिपण्णाची हत्या करण्यात आली. पोलिसांना त्याचा मृतदेह अर्धवट जळलेल्या व कुजलेल्या स्थितीत आढळला होता. तो कर्नाटक राज्यातील आहे. अनैतिक संबंधातून त्याची हत्या करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी कल्याण येथून फय्याज जाकीरहुसेन शेख, सिकंदर बादशहा मुजावर व गुलाम अकबर इफ्तीकार मौलवी यांना केली आहे. अन्य फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

