गायमुख घाटावर मल्टी एक्सेल कंटेनर उलट

गायमुख घाटावर मल्टी एक्सेल कंटेनर उलट

Published on

कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी
घोडबंदर वाहिनी गायमुख घाटातील प्रकार
ठाणे, ता. २७ (बातमीदार) : घोडबंदर वाहिनी गायमुख घाटाच्या वळणावर दुपारी एक मल्टिएक्सेल कंटेनर तिरपा होऊन बंद पडला. त्यामुळे या मार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली. कंटेनर काढण्यासाठी आलेले हायड्रा मशीनसुद्धा उलटल्याने या मार्गावरील कोंडी सायंकाळी उशिरापर्यंत होती. मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीत घोडबंदर वाहिनीवर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावर धीम्या गतीने वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यातच कंटेनर आणि हायड्रा मशीन उलटल्याने झालेली कोंडी नियंत्रणात आणण्याकरिता वाहतूक विभागाला प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला.
घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. जड-अवजड वाहनांना यातून मार्ग काढण्यासाठी प्रचंड सावधानता बाळगावी लागते. शिवाय हा घाट तीव्र उतार आणि चढणीचा असल्याने दररोज एक तरी अवजड वाहने बंद पडते. गुरुवारी (ता. २७) या घटनेची पुनरावृत्ती झाली. दुपारी मल्टिएक्सेल कंटेनर तिरपा होऊन बंद पडला. कंटेनर तिरपा झाल्यामुळे घोडबंदर वाहिनीवर संपूर्ण वाहतूक बंद झाली. कंटेनर बाजूला करण्याकरिता हायड्रा मशीन मागवण्यात आले. मात्र हे मशीनसुद्धा कंटेनर उचलत असताना पलटी झाले. पलटी झालेले मशीन सरळ करण्याकरिता आणखीन एक हायड्रा मशीन आणावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com