शिवडी येथील महापालिकेची शाळा हडप करणा-यांवर कारवाई करा
शिवडीतील पालिका शाळा हडपणाऱ्यांवर कारवाई करा
आयुक्तांकडे आमदाराची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : शिवडी येथील मुंबई महापालिकेच्या वसाहतीत असलेली पालिका शाळा पुनर्विकासात बांधून न देता गायब केल्याबाबत एसआरए अधिकारी, विकसक, पालिका अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, अशी मागणी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी केली आहे.
शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शिक्षण समितीत या शाळेचा विषय २०१६मध्ये उपस्थित केला होता. तेव्हा शिक्षण समितीची सभा याच विषयावर तहकूब झाली होती. तत्कालीन शिक्षण समिती अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाचे लेखी उत्तर येण्याअगोदरच ८ डिसेंबर २०१७ला एसआरएने विकसकाला टॉवर विकण्यास परवानगी दिली. रहिवाशांचे पुनर्वसन २०१४ला पूर्ण झाले; परंतु शाळा बांधलीच नाही. तरीही ५ जून २०१९ला पालिका सहआयुक्त (शिक्षण) यांनी शिक्षण समिती सभेत सदस्यांना खोटे उत्तर देऊन प्रश्न निकाली काढला; पण शाळेचे पुनर्वसन का झाले नाही किंवा कधी होणार आहे, याचे कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे शिक्षण विभागातील तत्कालीन अधिकारी यात सहभागी आहेत. याप्रकरणी चौकशी करून पालिकेची शाळा हडप केल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा, अशी मागणी भाजप आमदार उपाध्याय यांनी पत्रात केली आहे.
...
पोलिसांत तक्रार
हडप केलेल्या अशा सर्व शाळांची माहिती विधिमंडळ हिवाळी अधिवेशनापूर्वी कागदपत्रांसह तसेच कार्यअहवालासह देण्यात यावी, अशी मागणी आमदार उपाध्याय यांनी केली आहे. शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, दोषी व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

