सचिन पोटे समर्थकांचा काँग्रेस नेतृत्वावर संताप
राजाभाऊ पातकर यांच्याबद्दल नाराजी
पोटे समर्थकांकडून काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून रोष
कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशांचे पालन करीत आम्ही हे राजीनामे दिले. जिल्हाध्यक्ष बदलताना पाळली जाणारी परंपरा मोडण्यात आली. यामुळेच असंतोष उफाळून आल्याचे सांगत माजी जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे समर्थकांनी काँग्रेस नेतृत्वावर संताप व्यक्त केला. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष लिओ मेक्कनरॉय, कल्याण पूर्व ब्लॉक अध्यक्ष शकील खान, कल्याण पश्चिम ब्लॉक अध्यक्ष प्रवीण साळवे, कल्याण पूर्व ब्लॉक अध्यक्ष मनीषा सरजीने, डोंबिवली पूर्व ब्लॉक अध्यक्ष संकेत लोके, काँग्रेस कार्यकर्ता हेमराज डेरे आदींसह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पारंपरिकरीत्या नवीन काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष हे पूर्वीच्या जिल्हाध्यक्षांना भेटून पदभार स्वीकारतात. मात्र या वेळी तसे न करता जल्लोष करण्यात आल्याने ‘सचिन पोटे यांनी पक्ष सोडावा’ असा संदेश देण्याचा हेतू होता का, असा सवाल पोटे समर्थकांनी उपस्थित केला. याशिवाय नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या राजाभाऊ पातकर यांच्याबाबतही संताप व्यक्त करण्यात आला. पातकर यांनी २०१४ साली काँग्रेसचे उमेदवार असलेल्या सचिन पोटे यांच्याविरोधात बंड करून भाजपात प्रवेश केला होता. आणि १० वर्षे भाजपात राहून प्रचारही केला. भाजपच्या सत्ताकाळातही साधे वॉर्ड अध्यक्षपद न मिळालेल्या नेत्याला अचानक काँग्रेसमध्ये घेऊन जिल्हाध्यक्षपद देणे हा निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचा आरोप राजीनामा दिलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
हा संपूर्ण असंतोष एका पत्राद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. निर्णय मागे घेतला नाही तर सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा मार्ग अवलंबण्याचा इशाराही दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

