अंबरनाथमध्ये सुषमा अंधारे यांची तोफ धडाडली

अंबरनाथमध्ये सुषमा अंधारे यांची तोफ धडाडली

Published on

अंबरनाथमध्ये अंधारे यांची तोफ धडाडली
अंजली राऊत आणि उमेदवारांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबरनाथ ता. २८ (वार्ताहर) ः मुख्यमंत्री आणि भाजप नेतृत्व फक्त सत्ता वाचवण्यात गुंतले आहेत. अंबरनाथकरांच्या मूलभूत प्रश्नावर चर्चा करण्याइतपतही वेळ देत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. अंबरनाथमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अंजली राऊत यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. शिवसेनेचे २५ तर मनसेचे ११ असे एकूण ३६ उमेदवार अंबरनाथमधून रिंगणात आहेत.
‘अंबरनाथमधील सामान्य नागरिकांच्या पाणी, रस्ते, आरोग्य अशा मोठ्या समस्यांकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही. गद्दारीचे डांबर चेहऱ्याला लावणाऱ्यांनी रस्त्यांवर मात्र डांबर टाकण्याची तसदी घेतली नाही,’ अशी घणाघाती टीका अंधारे यांनी या वेळी केली.
भाजपने हिंदुत्वाचा ‘मार्केटिंग अजेंडा’ केला असून, साधू हत्याकांड, बलात्कार प्रकरणे, ड्रग्ज रॅकेट यावर मौन धारण करणाऱ्यांना खरी सूचिता नसल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. मुख्यमंत्री आणि भाजप नेतृत्व फक्त सत्ता वाचवण्यात गुंतले असून, अंबरनाथकरांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्याइतपतही वेळ देत नाहीत, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
शिवसेना सामान्य माणसाला असामान्य बनवते. आमचे उमेदवार बिल्डर लॉबीचे नाहीत तर तुमच्यातले आहेत, असे विधानही त्यांनी केले. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील कोरोना व्यवस्थापन, मुंबईतील उत्तम प्रशासन यांची उदाहरणे देत त्यांनी भाजपच्या खोट्या प्रचारावर टीका केली.
या वेळी मंचावर उपनेते अल्ताफ शेख, संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, माजी नगराध्यक्ष संपदा गडकरी, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के, शहर संघटक रमेश डोंगरे, शहर समन्वयक निशिकांत राऊत, शहर संघटक सोनाली जावळे, शहराध्यक्ष अजित काळे, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप मालवणकर यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अंजली राऊत, नगरसेवक पदाचे आघाडीचे उमेदवार श्रद्धा मंगेश पलांडे, अपर्णा संतोष शिंदे, संतोष शिंदे, कोमल जगदीश दळवी, सविता तुषार देशमुख, प्रवीण गोसावी, शर्मिला भास्कर भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश सुरसे, अनुपमा अशोक शिंदे, सिद्धेश राजेश शिर्के उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com