अंबरनाथमध्ये भाजपची ताकद दुणावली

अंबरनाथमध्ये भाजपची ताकद दुणावली

Published on

अंबरनाथमध्ये भाजपची ताकद वाढली
प्रहार जनशक्ती पक्षाचा बिनशर्त पाठिंबा!

अंबरनाथ, ता. २८ (वार्ताहर) ः अंबरनाथ नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला राजकीय आधार मिळाला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने भाजपच्या उमेदवाराला गुरुवारी (ता. २७) बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष आलम खान यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांची भेट घेत ही घोषणा केली.

अंबरनाथ पूर्व मतदारसंघातील भाजप मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयातील कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नगराध्यक्षपदासाठी भाजप-रिपाइं महायुतीच्या उमेदवार तेजश्री विश्वजित करंजुले यांच्या शहर विकासाच्या व्हिजनवरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे जनशक्ती पक्षाच्या आलम खान यांनी सांगितले.

रस्ते, पाणी, वीज, गटारे यांसारख्या शहरातील प्रमुख समस्यांचे योग्य नियोजनबद्ध समाधान तेजश्री करंजुले पाटील देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या जाहीर पाठिंब्यामुळे अंबरनाथमध्ये भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उपशहरप्रमुख दीपक पाटील, अमरनाथ पाल, खुशाल सोनकांबळे, विशाल गायकवाड, शफिक सलमान यांच्यासह सलून संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम शेख आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com