मुंब्र्यातील मोबाईल
चोरट्याला अटक

मुंब्र्यातील मोबाईल चोरट्याला अटक

Published on

मुंब्र्यातील मोबाईल चोरट्याला अटक

ठाणे, ता. २८ : ठाणे आणि मुंबई या शहरांत गर्दीच्या ठिकाणी, लोकल ट्रेनमध्ये मोबाईल फोन चोरणाऱ्या मुंब्र्यातील रफिक मोहम्मद शेख (४४) या सराईत चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून एक लाख २१ हजारांचे नऊ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, त्याने सात गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तक्रारदाराचा मोबाईल फोन ठाणे बाजारपेठ परिसरात चोरीस गेला होता. त्याप्रकरणी १६ नोव्हेंबरला ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा समांतर तपास सुरू असताना त्या गुन्ह्यातील संशयित आरोपीची पोलिस हवालदार गणेश बडगुजर यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपीस महात्मा फुले नगर येथे सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या वेळी ॲपल कंपनीचे तीन आयफोन त्याच्याकडे सापडले. त्यातील एक आयफोन तक्रारदाराचा असल्याचे निष्पन्न झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com