गोरेगावात एसआरए इमारतीला आग
गोरेगावात एसआरए इमारतीला आग
मालाड, ता. २८ (बातमीदार) ः गोरेगाव पश्चिम येथील गावदेवी उत्कर्ष एसआरए गृहनिर्माण सोसायटीमध्ये शुक्रवारी (ता. २८) सकाळी विजेच्या बॉक्सला भीषण आग लागली. ही सोसायटी बांगूरनगर मेट्रो स्थानकाच्या अगदी शेजारी असल्याने परिसरातही काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना सकाळी सुमारे ६.३० वाजता घडली.
विजेचा बॉक्स अचानक पेटल्याने आग जलदगतीने पसरू लागली. धूर आणि ज्वाळा वाढू लागल्याने रहिवासी घाबरून घराबाहेर पडले. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले; मात्र इमारतीसमोर जागा नसल्याने अग्निशमन दलाला रस्ता मोकळा करण्यासाठी अनेक दुकानांची शटर तोडावी लागली. त्यामुळे आग विझविण्यास विलंब झाला. अखेर सकाळी ७.३० वाजता आग नियंत्रणात आणली; मात्र तोवर मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

