प्रीती गौड यांचे निधन

प्रीती गौड यांचे निधन

Published on

प्रीती गौड यांचे निधन

मुंबई, ता. २८ : प्रसिद्ध रेडिओ अनाउन्सर आणि साहित्यिक प्रीती गौड यांचे आज शुक्रवारी (ता. २८) सकाळी निधन झाले. गोरेगाव येथील ऑस्कर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांचे पती शैलेंद्र गौड आहेत.
गेल्या काही काळापासून त्या आजारी असून, उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अचानक खालावली. प्रीती यांनी दीर्घकाळ रेडिओ क्षेत्रात कार्यरत राहून आपला स्वतंत्र ठसा उमटवला. प्रभावी आवाज, निवेदनकला आणि साहित्यावरील प्रेम यामुळे त्यांची ओळख बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून होती. अनेक साहित्यिक कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक मंचांवर त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. साहित्य निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी आपले योगदान सातत्याने दिले. कला, संस्कृती आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. समाज माध्यमांवरही चाहत्यांनी आणि परिचितांनी दुःख व्यक्त करून त्यांना आदरांजली अर्पण केली. प्रीती गौड यांच्या निधनाने रेडिओ व साहित्य क्षेत्रातील एक जाणकार, समर्पित आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या आठवणी, कार्य आणि कलेप्रति असलेली निष्ठा दीर्घकाळ स्मरणात राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com