ठाण्यात एक कोटींचा एमडी पकडला ; दोघे जेरबंद
ठाण्यात एक कोटींचा एमडी जप्त
ठाणे : एमडी विक्रीप्रकरणी सचिन सुभाष चव्हाण आणि रवि शामवीर डागुर या दुकलीला ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक करून त्यांच्याकडून ९९९.२ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ व इतर वस्तू जप्त केल्या आहेत. या एमडीची किंमत एक कोटी ९२ हजार इतकी असून, याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेला मुद्देमाल राजस्थान येथून आणण्यात आला असल्याचे आढळून आले, अशी माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

