ठाण्यात इंटरनॅशनल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
ठाण्यातून विदेशातील
महिला पीडितांची सुटका
ठाणे, ता. २८ ः ठाण्यातील घोडबंदर येथे आनंदनगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या इंटरनॅशनल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात गुरुवारी (ता. २७) पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी एका २८ वर्षीय परदेशी महिलेला अटक करत तिच्या रखवालीतून दोन परदेशी महिलांची सुटका केली आहे. तसेच त्या परदेशी महिलेला ठाणे न्यायालयाने १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही दलाल परदेशी महिला जुलै २०२५ पासून त्या परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घोडबंदर रोडवरील आनंदनगर परिसरात परदेशी दलाल महिला दोन परदेशी महिलांना पैशांचे आमिष दाखवत वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या वेळी मोबाईलसह सहा हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आढळला, तसेच थायलँडमधील २८ वर्षीय दलाल महिलेला पकडून तिच्या रखवालीतून थायलंडनिवासी असलेल्या दोन पीडित महिलांची सुटका केली. भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३चे कलम १४३ (१) १४३ (३) सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६चे कलम ४ व ५ प्रमाणे कासारवडवली पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २७) गुन्हा दाखल करीत त्या दलाल महिलेला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्या परदेशी महिलेला १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

