डहाणूत १२५ दिव्यांगांना १४५ कृत्रिम अवयवांचे वितरण

डहाणूत १२५ दिव्यांगांना १४५ कृत्रिम अवयवांचे वितरण

Published on

डहाणूत १२५ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे मोफत वितरण!
कासा, ता. २९ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ''दिव्यांग मुक्त भारत'' या संकल्पनेला बळ देण्यासाठी समदर्शन सेवा परिवार, मुंबई यांच्या वतीने डहाणूतील कोसबाड येथील मल्लिनाथ जैन मंदिरात भव्य कृत्रिम अवयव वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २२ ते २७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या या शिबिरात १२५ दिव्यांग व्यक्तींना एकूण १४५ कृत्रिम अवयवांचे (६० कृत्रिम पाय, ६५ कॅलिपर आणि २० कृत्रिम हात) मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक दिव्यांगांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळाला आहे.
कोलकाता येथील प्रख्यात तज्ज्ञ डॉ. एस. एस. प्रभाकर यांनी शिबिराचे नेतृत्व केले. त्यांनी आजपर्यंत साडेचार लाखाहून अधिक दिव्यांगांना चालण्यायोग्य बनवले आहे. चिंचणी, बोईसर, डहाणू, वापी-वलसाड, जव्हार तसेच जळगाव आणि धुळे अशा विविध भागांतून दिव्यांग नागरिक या शिबिरात सहभागी झाले होते.
या यशस्वी आयोजनासाठी समदर्शन सेवा परिवार, मुंबईचे सुरेश मुच्छाला आणि त्यांचे सहकारी विरेन पंचोली, सुनील सोनी, तसेच पर्यावरणप्रेमी शिक्षक दीपक देसले यांनी विशेष प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com