विद्यार्थ्यांनी गिरवले कचरा व्यवस्थापनाचे धडे
विद्यार्थ्यांना ''कचरा व्यवस्थापनाचे धडे''
भाईंदर, ता. २७ (बातमीदार) : मीरा-भाईंदर महानगरपालिकेने विद्यार्थ्यांमध्ये कचरा व्यवस्थापनाची जागरूकता वाढवण्यासाठी ''स्वच्छतेची पाठशाळा'' हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत एन. एस. शाळेत ''कचरा वर्गीकरणाचा'' खेळ आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना ओल्या व सुक्या कचऱ्याचे महत्त्व समजावे यासाठी ''ओला कचरा संघ'' आणि ''सुका कचरा संघ'' अशा दोन संघांची रचना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी या खेळात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कचरा वर्गीकरणाचे धडे गिरवले.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण आणि योग्य कचरा व्यवस्थापनाची समज वाढण्यास मदत होणार आहे. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, यापुढे प्रत्येक शाळेतून ''स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर मुलगा'' आणि ''स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर मुलगी'' यांची निवड करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी ''स्वच्छतेचे संदेशवाहक'' म्हणून तयार होतील, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

