स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Published on

पालघरमध्ये २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी!
पालघर, ता. २९ (बातमीदार) : नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघात मंगळवारी (ता. २) राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
या क्षेत्रातील मतदारांना, जे कामासाठी जिल्ह्याबाहेर किंवा सीमेलगतच्या भागात कार्यरत आहेत, त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा सर्व कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. दरम्‍यान, या निवडणुकीसंदर्भात कोणत्याही तक्रारी किंवा अडचणी असल्यास, २ डिसेंबर रोजी कामगार उप आयुक्त, पालघर यांच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी ०२५२५-२९७१०२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कामगार उप आयुक्त, पालघर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com