चीन राज्यक्रांतीवर व्याख्यान
स्वातंत्र्य व्याख्यानमालेत चीन राज्यक्रांतीवर व्याख्यान
विरार, ता. २९ (बातमीदार) : श्रमजीवी संघटना महाराष्ट्रातर्फे कार्यकर्त्यांच्या वैचारिक विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या ''स्वातंत्र्य व्याख्यानमाला'' या उपक्रमांतर्गत सोमवारी (ता. १) ''चीन राज्यक्रांती'' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक राजकारण आणि आधुनिक चीनचा उदय समजून घेण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक मृदुल निळे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. चीनमधील सामाजिक-राजकीय स्थित्यंतर, व्यक्ती स्वातंत्र्यावरील मर्यादा आणि जगातील चीनच्या प्रगतीवर ते सखोल विश्लेषण करतील. श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर हे अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत संविधान सभागृह, पू. सानेगुरुजी प्रशिक्षण संस्था, उसगाव डोंगरी, वसई येथे होणार आहे. संस्थेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मासिक व्याख्यानमालेमुळे कार्यकर्त्यांची वैचारिक पकड मजबूत होत आहे. या व्याख्यानाचा संयोजक विजय पै आहेत. कार्यक्रमास प्रवेश मर्यादित असून, नोंदणीसाठी सुहास मुकणे (७५०७५१६६००) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

