अपक्ष उमेदवारीमुळे समीकरणे बदलली

अपक्ष उमेदवारीमुळे समीकरणे बदलली

Published on

अपक्ष उमेदवारीमुळे समीकरणे बदलली
बदलापुरात नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची

बदलापूर, ता. २९ (बातमीदार): मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनी नगराध्यक्षपदासाठी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यामुळे बदलापूरच्या राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. चेंदवणकर यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला मोठा फटका बसू शकतो, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.

नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा असतानाच आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने चेंदवणकर यांना सदस्यत्वाची अट घातली होती. ही अट नाकारत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. आघाडीने अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर उमेदवारी मागे घेण्याचा दबाव वाढला, मात्र मतदारांची फसवणूक होऊ नये आणि स्वतःचे राजकीय अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.

विविध आंदोलनांत आणि विशेषतः अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या निषेधात त्या अग्रस्थानी राहिल्याने चेंदवणकर शहरात एक परिचित आणि लोकप्रिय चेहरा बनल्या आहेत. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रिया गवळी यांच्या मतांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चेंदवणकर यांच्या मते, स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी पक्षापेक्षा नागरिक महत्त्वाचे आहेत, या भूमिकेतूनच त्यांनी निवडणुकीत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांशी थेट संवाद
प्रचाराला अवघे दोन दिवस उरले असताना अपक्ष उमेदवार संगीता चेंदवणकर यांनी लोकांशी थेट संपर्क साधण्यासाठी बदलापूर रेल्वेस्थानक गाठले आहे. स्थानकावरच्या त्यांच्या सकस संवादाने आणि थेट जनतेसमोर मांडलेल्या भूमिकेमुळे प्रवाशांसह नागरिकांमध्ये त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळेत त्यांनी प्रवाशांशी संवाद साधत लोकलच्या संख्येत वाढ, गर्दीचा त्रास आणि वाढत्या प्रवासी दडपणाची तीव्रता अशा समस्या समजून घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com