मोखाड्यात पाणी फाऊंडेशनचे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ प्रशिक्षण

मोखाड्यात पाणी फाऊंडेशनचे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ प्रशिक्षण

Published on

मोखाड्यात ''सत्यमेव जयते फार्मर कप''चे प्रशिक्षण उत्साहात
मोखाडा. ता. २९ (बातमीदार) : कृषी, पाणी संवर्धन आणि ग्रामविकास या विषयांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभाग, आत्मा आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाडा येथे ''सत्यमेव जयते फार्मर कप'' उपक्रमांतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तहसीलदार कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, मंडळ कृषी अधिकारी आकाश सोळुंखे, उपकृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, तरुण व प्रगतशील शेतकरी आणि कृषी सखींची मोठी उपस्थिती होती.
तज्ज्ञांनी यावेळी पावसाच्या पाण्याचे नियोजन, भूजल पातळीत वाढ, पीक उत्पादन सुधारणा आणि गावाच्या सर्वांगीण विकासाला मिळणारे बळ यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
पाणी फाऊंडेशनचे मास्टर ट्रेनर प्रणय गोरीवले आणि विकास कळमकर यांनी माती-जल संवर्धन, शाश्वत कृषी तंत्रज्ञान, जलसंधारण संरचना आणि स्पर्धेचे नियम यावर माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी गटशेतीचे महत्त्व व यशस्वी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य दिशादर्शन मिळाल्याने पाणी व्यवस्थापनाच्या चळवळीला गती मिळेल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com