वणईतील स्मशानभूमीसाठी अखेर तीन वर्षांनी पर्यायी जागेला मंजुरी
स्मशानभूमीसाठी अखेर पर्यायी जागेला मंजुरी!
कासा, ता. २९ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे डहाणू तालुक्यातील वणई येथील गट क्र. ३३३ मधील स्मशानभूमी संपादित झाली होती. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पर्यायी जागेच्या मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर, बुलेट ट्रेन प्रशासनाने (एनएचएसआरसीएल) वणई येथील सर्वे क्र. ३३१ मधील ०.१० हेक्टर खासगी जमीन स्मशानभूमीसाठी वापरण्यास अधिकृतपणे हरकत नसल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन शाखेला दिले आहे.
स्मशानभूमी संपादित झाल्याने अंत्यविधीसाठी वणई, आंबिस्ते, कॉलनीपाडा येथील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रशासनाकडून मंजुरी मिळाल्याने आता नवीन जागेवरील पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण होणार असून, ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन जागेचा ताबा घेताना ग्रामस्थांनी श्रीफळ वाढवून आनंद व्यक्त केला. लवकरच ही जमीन ग्रामपंचायतीच्या नावावर करण्यात येणार आहे. ताबा हस्तांतरणावेळी सरपंच कामिथी जनाथे, ग्रामसेवक मिलिंद गायकवाड, तलाठी प्रताप सांबरं, कष्टकरी संघटनेचे मधुबाई धोडी, रघु सुतार, ग्रामस्थ गुलाब वेलपडा, मैना पारस यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

