‘शिव पाणंद’चा ऐतिहासिक एल्गार
वज्रेश्वरी, ता. २९ (बातमीदार) : महाराष्ट्रातील शेवटच्या शेतकरी भावापर्यंत दर्जेदार शेतरस्ता पोहोचवणे आणि शेतरस्त्यांवरील कायमस्वरूपी अडचणी दूर करणे, या उद्दिष्टांसाठी काम करणारी ‘शिव पाणंद शेतरस्ता चळवळ’ आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. “शेत तिथे रस्ता - गाव तिथे समृद्धी” हा नारा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी चळवळीने एकात्मता आणि सामूहिक नेतृत्वाचा व्यापक दृष्टिकोन स्वीकारला असून, राज्यभरात या कार्याची गती वाढली आहे.
मुंबईतील आझाद मैदानात गुरुवारी (ता. २७) विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक झाली. आगामी आंदोलनाची दिशा, जनजागृती कार्यक्रम आणि संवाद धोरणावर महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. राज्यभर प्रशासन, सरकार आणि न्यायालयीन स्तरावर सातत्यपूर्ण लढा देत या चळवळीने अनेक तालुके आणि जिल्ह्यांत संघटन बळकट केली आहे. यात सरकारचे लक्ष वेधण्यात मोठे यश मिळवले आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नांना प्रतिसाद देत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय जाहीर केले. निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात भेटी देऊन संबंधित विभागांना निवेदने सादर करत नियमित पाठपुरावा केला आहे. ‘शेत तिथे रस्ता - गाव तिथे समृद्धी’ या राज्यव्यापी जनजागृती अभियानाची सुरुवात मंत्रालयातून करण्यात आली. ग्राम, तालुका आणि जिल्हा पातळीवर हे अभियान भव्य आणि प्रभावी स्वरूपात राबवून सरकार निर्णयांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, ॲड. सागर जोरी, ॲड. प्रणाली यवळे, शांताराम पानमंद, सचिन शेळके, रामहरी बोंबे, दत्तात्रय बांगर, सुरेश भुजबळ, संजय साबळे, बबन गुंड, भाऊसाहेब वाळूंज, दशरथ वाळूंज, संजय जाधव, संजना जाधव, स्वप्नील कोहकडे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

