रोड अपघातात चिमुरडा जखमी
तीनवर्षीय चिमुकल्याला स्कूलबसची धडक
गंभीर मार, मूत्रपिंडावर शस्त्रक्रिया; गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : शाळा सुटल्यावर घरी जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना तीनवर्षीय चिमुरड्याला एका स्कूलबसने धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून, त्याला मुंबईतील सायन रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तपासल्यावर त्याच्या मूत्रपिंडाला मार लागल्याचे सांगून तातडीने शस्त्रक्रिया केली आहे.
कृष्णा पटेल असे त्या तीन वर्षीय चिमुकल्याचे नाव असून, तो सोमवारी (ता. २४) मावशी वैष्णवी शिंदेसोबत घरी जात होता. यादरम्यान रस्ता ओलांडताना स्कूलबसने त्या दोघांना धडक दिली. या वेळी वैष्णवी आणि कृष्णा हे दोघे खाली पडले. त्यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र कृष्णा याच्या कमरेला आणि पायाला मुका मार लागल्याने सायन रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. येथे डॉक्टरांनी तपासल्यावर त्या चिमुरड्याच्या मूत्रपिंडास मार लागल्याचे सांगत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात स्कूलबसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजूषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

