डोंबिवलीतील मोक्षधाम स्मशानभूमी सोमवार पासून बंद
''मोक्षधाम'' स्मशानभूमीचे नूतनीकरण
पर्यायी ठिकाणांचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन.
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर परिसरालगत असलेली ''मोक्षधाम'' स्मशानभूमी सोमवारपासून (ता. १) नूतनीकरणाच्या कामासाठी पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. शहरातील ही महत्त्वाची स्मशानभूमी असून, देखभाल-दुरुस्तीअभावी तिची अवस्था दयनीय झाली होती. महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या स्मशानभूमींपैकी दत्तनगर येथील ''मोक्षधाम'' एक आहे; मात्र, जुने बांधकाम आणि अनेक वर्षांपासून झालेली दुर्लक्ष यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
वाढत्या लोकसंख्येनुसार आणि नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन केडीएमसीने आता मोक्षधामच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेतले आहे. यापूर्वीच डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखाण पाडा, पूर्वेकडील पाथर्ली स्मशानभूमी (गॅस शवदाहिनीसह) यांचे आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे. तसेच ठाकुर्ली समांतर रस्ता आणि कोळेगाव येथे नव्या स्मशानभूमी उभारल्या गेल्या आहेत. पाथर्ली स्मशानभूमीचे काम पूर्ण झाल्यावर आता दत्तनगरमधील ''मोक्षधाम''चे काम हाती घेण्यात येत आहे. नूतनीकरण पूर्ण होईपर्यंत ही स्मशानभूमी बंद राहणार आहे.
नागरिकांसाठी पर्यायी स्मशानभूमी
रामनगरमधील ''मोक्षधाम'' बंद राहणार असल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी तात्पुरत्या काळात पुढील स्मशानभूमींचा वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
पाथर्ली स्मशानभूमी (गॅस शवदाहिनी उपलब्ध)
ठाकुर्ली – म्हसोबा चौक स्मशानभूमी
चोळेगाव स्मशानभूमी
कुंभारखाण पाडा स्मशानभूमी (गॅस शवदाहिनी उपलब्ध)
मोठागाव स्मशानभूमी
जुनी डोंबिवली स्मशानभूमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

