संविधान मूल्यांचा दैनंदिन जीवनात अवलंब

संविधान मूल्यांचा दैनंदिन जीवनात अवलंब

Published on

संविधान मूल्यांचा दैनंदिन जीवनात अवलंब करा
कल्याण (वार्ताहर) : पालिकेत संविधान दिन उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संविधान मूल्यांची जनजागृती शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या पूर्ण वर्षभरात ‘हर घर संविधान’, सामूहिक प्रास्ताविक वाचन, निबंध, वक्तृत्व, रंगोळी स्पर्धा, व्याख्यानमाला आणि चर्चासत्रे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यक्रमात आयुक्त अभिनव गोयल यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांनी मूलभूत अधिकारांबरोबरच मूलभूत कर्तव्यांचे पालन करून समानता, न्याय आणि लोकशाही मूल्यांचे दैनंदिन जीवनात पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात संविधान अभ्यासक व विश्लेषक प्राध्यापक नूरखा पठाण यांनी भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, लोकशाही व्यवस्था, सामाजिक समरसता आणि बदलत्या सामाजिक संदर्भातील संविधानाचे महत्त्व या विषयांवर प्रभावी विचार मांडले. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त संजय जाधव, प्रसाद बोरकर, रामदास कोकरे, महापालिका सचिव किशोर शेळके, प्रमुख पाहुणे सिद्धोधन आहेर, माजी महापौर रमेश जाधव, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा रोकडे, रतन बनसोडे, संयोजक चंद्रकांत पोळ, विजय सरकटे आणि संतोष हेरोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्था अध्यक्ष चंद्रकांत पोळ यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com