लहान मुलांच्या मनातील डोळयांची भिती दूर

लहान मुलांच्या मनातील डोळयांची भिती दूर

Published on

ईशा नेत्रालयाच्या वतीने जनजागृतीपर कार्यक्रम
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : लहान मुलांच्या मनातील असलेली डोळयांची भीती दूर करण्यासाठी ईशा नेत्रालय यांच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणमधील पियुष डान्स अकादमीच्या वतीने यावेळी नृत्य कार्यक्रम सादर केले.
याप्रसंगी डॉ. पुष्पांजली रामटेके यांनी म्हणाल्या की, डोळ्यांच्या उपचाराबाबत लहान मुले घाबरतात. त्यांना वाटते कि डोळ्याला काही इजा झाल्यास डॉक्टर डोळयामध्ये इंजेक्शन देतात. यामुळे लहान मुले सहजासहजी डोळ्यांच्या रुग्णालयामध्ये जात नाहीत. त्यांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पियुष डान्स अकादमीचे पियुष सेन यांनी सांगितले की, ईशा नेत्रालयाचा कार्यक्रम खूप छान होता. लहान मुलांच्या मनातील डोळयाची भीती या कार्यक्रमातून दूर होईल. मुलांना आठ ते दहा तास झोप घेणे आवश्यक आहे. पालेभाज्या खाणेही गरजेचे आहे. लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवले पाहिजे, असे पियुष सेन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com