दिव्यातील आर. एल. पी. हायस्कुलमध्ये लसीकरण मोहीम
दिव्यातील आरएलपी हायस्कूलमध्ये लसीकरण मोहीम
ठाणे, ता. २९ : शालेय विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मुलांचे वेळोवेळी लसीकरण करणे महत्त्वाचे असते. शुक्रवारी (ता. २८) दिवा शहरातील मुंब्रादेवी कॉलनी येथील आरएलपी हायस्कूलमध्ये टेटन्स लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दहा ते बारा वर्ष वयोगटातील शालेय मुलांना आणि सोळा वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली. शाळेतील शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेला पालकांचाही पाठिंबा होता. ही लस का घ्यावी याबद्दल पालकांना व मुलांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. प्रसंगी शाळेचे विश्वस्त राजेश पांडे, प्रमोद, संतोष, मनोज आणि मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी होत विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष सहकार्य केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

