अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष पथक

अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष पथक

Published on

जुईनगर, ता. २९ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे विशेष अतिक्रमणविरोधी पथक स्थापित करण्यात आले आहे. त्यामुळे बाजार परिसरात चालणाऱ्या बेकायदा व्यवसाय आणि अतिक्रमणांना आळा बसणार आहे, अशी अपेक्षा आहे.

आतापर्यंत बाजार आवारात मोठ्या प्रमाणात बेकायदा व्यापार आणि अनधिकृत बांधकाम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बाजार आवारातील अनधिकृत बांधकामे, स्टॉल, वास्तव्यास असलेले परप्रांतीय आणि फसवे व्यापारी या पथकाच्या रडारवर आले आहेत. शिवाय या प्रकारांच्या मागे असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरदेखील संक्रांत येणार असल्याचे दिसत आहे.

२०१९ पासून बाजार आवारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शिवाय महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने अतिक्रमण वाढले आहे. अनेक बांधकामे बाजार समिती व महापालिकेच्या कोणतीही परवानगी न घेता दुरुस्तीच्या नावाखाली दोन मजली बांधकामे काही व्यापाऱ्यांनी केली आहेत.

पाच सदस्यांची निवड
मुंबई एपीएमसी सचिवांनी पाच सदस्यीय ‘स्पेशल टास्क फोर्स’ची नियुक्ती केली आहे. यामध्ये सहसचिव (पथक प्रमुख) मंदार साळवी, सहाय्यक मुख्य सुरक्षा अधिकारी के. के. रासकर, उपअभियंता पी. के. पिंगळे, वरिष्ठ लिपिक (मालमत्ता विभाग) बी. पी. पाटील, सहाय्यक महिला वैद्यकीय अधिकारी अक्षता देवणे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com