नेरूळमधील तलावात मृत माशांमुळे भीतीचे वातावरण

नेरूळमधील तलावात मृत माशांमुळे भीतीचे वातावरण
Published on

नेरूळमधील तलावात मृत माशांमुळे भीतीचे वातावरण
परिसरात खळबळ; प्रदूषणाचा संशय, राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी
नेरूळ, ता. २९ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर १८ येथील हशा ठाकूर तलावात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तलावातील पाण्यात विषारी किंवा रासायनिक द्रव्य मिसळल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात असून, यामुळे तलावातील जलचरांचे मोठे नुकसान झाले आहे. मृत मासे पाण्याच्या कडेला सडलेल्या अवस्थेत दिसू लागल्याने तलावाभोवती दुर्गंधी, प्रदूषण आणि संभाव्य आरोग्यधोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारवाईची मागणी केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. तलाव परिसरात काही औद्योगिक किंवा रासायनिक कचरा टाकला गेला असावा असा संशय व्यक्त होत असून, या प्रकारामुळे जलचरांची संख्या झपाट्याने घटल्याचे प्राथमिक निरीक्षणातून दिसत आहे. या गंभीर प्रकरणाबाबत नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नामदेव भगत यांनी नवी मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना आणि नेरूळ विभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तलावातील पाण्याचे नमुने तात्काळ तपासणीसाठी पाठवावेत, मृत मासे त्वरित गोळा करून त्यांची सुरक्षित विल्हेवाट लावावी, तलाव परिसरात स्वच्छता मोहीम करण्यात यावी, प्रदूषणकारी पदार्थ टाकणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, पर्यावरण विभाग आणि मत्स्य विभाग यांनी संयुक्त तपास करून सविस्तर अहवाल प्रसिद्ध करावा, आदी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com