पनवेलमध्ये महिला सक्षमीकरणाचा उपक्रम
पनवेलमध्ये महिला सक्षमीकरणाचा उपक्रम
चार हजाराहून अधिक जणांना मिळणार शिलाईसह घरघंटी मशीन
पनवेल, ता. २९ (बातमीदार) ः पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत घरघंटी व शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या चार हजारहून अधिक पात्र लाभार्थींना सोमवार ता.एक डिसेंबर पासून शिलाई व घरघंटी मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम पनवेल मतदारसंघात घरगुती उद्योगांना नवी दिशा प्रदान करणारा ठरणार आहे. महिलांच्या हाती रोजगाराचे साधन दिल्यास त्यांच्या कुटुंबाच्या उन्नतीपासून समाजाच्या प्रगतीपर्यंत मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्या दृष्टिकोनातून संकल्पना प्रत्यक्षात साकार केली. त्यांनी संबंधित प्रशासनाकडे या संदर्भात पाठपुरावा केला. या उपक्रमामुळे पनवेल मतदारसंघातील महिलांच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारे आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून, या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा प्रभावी मार्ग प्रशस्त होत आहे. याचबरोबर पुढील टप्प्यातही हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, इच्छुक महिलांनी आपली नोंदणी करून आगामी आर्थिक वर्षांत उपलब्ध होणाऱ्या निधीमधून त्यांना लाभ घेता येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमर देवेकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
............
कागदपत्रांची होणार पडताळणी
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही योजना पारदर्शक करण्यासाठी इच्छुक महिलांकडून घरघंटी किंवा शिलाई मशिन यासाठी महिलांचे अर्ज मागविण्यात आले आणि त्या अर्जाची व संबंधित कागदपत्रांची शासकीय नियमाने पडताळणी करण्यात आली. त्यामधून निवड झालेल्या पात्र लाभार्थीना त्या वस्तूचे आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. पनवेल मतदारसंघात सुरू होणारा हा उपक्रम महिला उद्योजकतेला बळ देणारा ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

