कोस्टल रोडवरील गवत छाटणीला सुरुवात
कोस्टल रोडवरील गवत छाटणीला सुरुवात
सकाळच्या वृत्ताचा परिणाम;द्रोंणागिरीत उत्साहाचे वातावरण
उरण, ता. २९ (वार्ताहर) : सिडको वसाहत ते जेएनपीटी हायवे दरम्यानच्या सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडलगत वाढलेल्या गवताबाबत ‘सकाळ’ वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. सकाळच्या वृत्तानंतर सिडको प्रशासनाने तातडीची दखल घेत ठेकेदारांच्या मदतीने गवतछाटणीची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. या कारवाईमुळे द्रोणागिरी परिसरातील निसर्गप्रेमींमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी ‘सकाळ’चे विशेष आभार मानले आहेत.
कोस्टल रोडलगत सिडकोने करोडो रुपये खर्च करून सुमारे चार हजार नारळाची झाडे लावली आहेत. गेल्या काही वर्षांत या झाडांची वाढ उत्तम झाली असली, तरी अलीकडे त्यांच्या आजूबाजूला गवताचा प्रचंड विळखा तयार झाला होता. पावसाळा संपून बरेच दिवस उलटल्याने हे गवत सुकून गेले होते. सूर्यप्रकाशात हे पूर्णपणे कोरडे गवत कोणत्याही क्षणी पेट घेऊ शकणार असल्याने, हजारो नारळीची झाडे आगीच्या धोक्यात असल्याची भीती निसर्गप्रेमींनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सिडको अधिकाऱ्यांनी तत्काळ हालचाली केल्या. झाडांच्या संरक्षणार्थ गवत काढण्याचे आदेश देत ठेकेदारांना कामाला लावण्यात आले. सध्या कोस्टल रोडच्या दोन्ही बाजूंसह डिव्हायडरमधील वाढलेले गवत वेगाने साफ केले जात आहे.
................
निसर्गप्रेमींच्या मते, गवताला आग लागली असती तर लाखो रुपयांचा पर्यावरणीय आणि आर्थिक तोटा झाला असता. प्रशासनाच्या तातडीच्या कृतीमुळे झाडांचे रक्षण होणार आहे. याशिवाय, वाढलेल्या गवतामुळे नारळीच्या झाडांना पाणी देण्यास देखील अडथळा येत होता. आता छाटणी सुरू झाल्याने झाडांच्या देखभालीसाठी आवश्यक सोयी पुन्हा सुरळीत होतील, अशी अपेक्षा आहे. सिडको प्रशासनाकडून या पुढाकाराचे सर्वत्र स्वागत होत असून, कोस्टल रोडचा निसर्गसौंदर्य टिकवण्यासाठी अशाच प्रकारच्या नियमित देखभालीची गरज असल्याचे निसर्गप्रेमींनी नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

