वाशीमध्ये क्रेडाई–बीएएनएमचा २४ वा प्रॉपर्टी एक्स्पो

वाशीमध्ये क्रेडाई–बीएएनएमचा २४ वा प्रॉपर्टी एक्स्पो

Published on

वाशीमध्ये क्रेडाई-बीएएनएमचा २४वा प्रॉपर्टी एक्स्पो
१२ ते १५ डिसेंबरदरम्यान ५०० हून अधिक गृहप्रकल्पांचे प्रदर्शन
वाशी, ता. २९ (बातमीदार) ः नवी मुंबईतील तब्बल ३०० हून अधिक प्रतिष्ठित विकसकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रेडाई-बीएएनएमतर्फे ‘२४वा नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ जाहीर झाला असून हा मेगा एक्स्पो १२ ते १५ डिसेंबरदरम्यान वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मोठ्या उत्साहात आयोजित केला जाणार आहे. नवी मुंबईतील बदलत्या शहरी रचनेला आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांना अधोरेखित करणारी यंदाची थीम ‘नवी मुंबई - भविष्याची धावपट्टी’ अशी ठेवण्यात आली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा डिसेंबर २०२५ मधील पहिला टप्पा, एमटीएचएल, मेट्रो विस्तार, पाम बीच रोड अपग्रेडेशन, कोस्टल रोड, विरार-अलिबाग मल्टी-मॉडल कॉरिडॉर, एअरो सिटी, एज्युकेशन सिटी, नैना आणि पुष्पकनगरसारखे प्रगत प्रकल्प यामुळे नवी मुंबई देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या रिअल इस्टेट मार्केटपैकी एक होत आहे. या पार्श्वभूमीवर हा एक्स्पो खरेदीदार, गुंतवणूकदार आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. ५० हून अधिक आघाडीचे विकसक विविध श्रेणींतील ५०० पेक्षा अधिक प्रकल्पांसह सहभागी होणार असून निवासी, व्यावसायिक, लक्झरी हाउसिंग, टाउनशिप, पुनर्विकास या सर्व पर्यायांची विस्तृत माहिती एका छताखाली उपलब्ध होणार आहे. वित्तीय संस्थांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्यात आला असून, त्वरित कर्ज सुविधा, गृहकर्ज सल्लामसलत आणि गुंतवणूक मार्गदर्शन यांची विशेष सोय ठेवण्यात आली आहे.
.............
शहरातील वाढत्या पुनर्विकास उपक्रमांना चालना देण्यासाठी १४ डिसेंबर रोजी विशेष चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे. गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास प्रक्रियेतील कायदेशीर, तांत्रिक आणि आर्थिक बाबींवर तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे. एक्स्पोमध्ये डबल धमाका लकी ड्रॉ, हे विशेष आकर्षण असून ऑन-द-स्पॉट बुकिंग करणाऱ्या दोन भाग्यवान विजेत्यांना प्रत्येकी एक कार भेट म्हणून देण्यात येणार आहे. या वर्षी ई.व्ही. होम्स हे शीर्षक प्रायोजक असून पॅराडाईज ग्रुप, एम्पेरिया ग्रुप, गामी ग्रुप आणि श्रीजी व्हेंचर्स हे सह-प्रायोजक आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया या एक्स्पोची अधिकृत बँकिंग पार्टनर आहे. एक्स्पोचे नेतृत्व संयोजक महेश पटेल, सहसंयोजक झुबिन संघोई, हितेश गामी करत असून संपूर्ण उपक्रम यशस्वीपणे अनुभवसमृद्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती क्रेडाई-बीएएनएमचे अध्यक्ष रसिक चौहान यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com