नवी मुंबईत दोन दिवसांत सहा मुली बेपत्ता

नवी मुंबईत दोन दिवसांत सहा मुली बेपत्ता

Published on

नवी मुंबईत दोन दिवसांत सहा मुली बेपत्ता
पोलिसांकडून शोध सुरू, परत न आल्याने पालक चिंतेत

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २९ : नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीत मुली बेपत्ता होण्याचे गेल्या दोन दिवसांपासून सत्र सुरू आहे. रबाळे, एपीएमसी आणि कोपरखैरणे ठाण्यांच्या हद्दीतून चार मुली गायब झाल्याच्या ताज्या प्रकरणानंतर, तुर्भे आणि एनआरआय सागरी पोलिस ठाण्यांतून आणखी दोन मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शोध सुरू केला आहे; मात्र दोन दिवसांनंतर मुली परत न आल्याने पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
तुर्भे पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर परत न आल्याची तक्रार कुटुंबीयांनी नोंदवली आहे. परिसरातील सीसीटीव्ही, मार्गावरील हालचाली आणि मोबाईल लोकेशन्स यांचा तपास सुरू असून, एखाद्याने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, एनआरआय सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षीय मुलगी रहस्यमयरीत्या गायब झाली आहे. ती घरात एकटी असताना अचानक दिसेनाशी झाली असून तिचा मोबाईल बंद असल्याने शोधमोहीम अधिक आव्हानात्मक झाली आहे. या मुलीचे नाव यापूर्वी काही प्रकरणांत नमूद असल्याची नोंद पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे तपासाची दिशा अधिक व्यापक ठेवून पोलिसांनी छाननी सुरू केली आहे. रबाळे, एपीएमसी आणि कोपरखैरणे पोलिस ठाण्यांतही अशाच प्रकारे चार मुली घराबाहेर पडल्यावर परत न आल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
---
कारणे अद्याप अस्पष्ट
बेपत्ता होण्याची कारणे अद्याप स्पष्ट नसून, अनेक प्रकरणांत कुटुंबीयांना कोणताही पुरावा किंवा हालचाल दिसून आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अल्पवयीन मुलगी हरवल्यास तातडीने अपहरणाचा गुन्हा नोंदविणे बंधनकारक असल्याने सर्व प्रकरणांत भा.द.वि. ३६३च्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांनी सतर्क राहून याबाबत कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास पोलिस ठाण्यात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com