“युती टिकवायची की नाही हा भाजपचा प्रश्न

“युती टिकवायची की नाही हा भाजपचा प्रश्न

Published on

महायुती टिकवायची की नाही हे त्यांनी ठरवावं
खासदार शिंदे यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना टोला
उल्हासनगर, ता. २९ (बातमीदार) ः आम्ही सर्व निवडणुका महायुतीत लढवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. मात्र २ डिसेंबरनंतर महायुती टिकवायची की नाही हे त्यांनी ठरवावं, असा टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना लगावला.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी उपमहापौर जया साधवानी यांच्या खेमानी परिसरातील बाल्कन जी बारी ट्रस्ट आणि सोभर लाइफ फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी नशामुक्ती केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्‍घाटन केल्यावर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही अंबरनाथमध्ये महायुतीसाठी प्रयत्न केले; पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे शिवसेनेने अंबरनाथ नगराध्यक्षपदासाठी मनीषा वाळेकर निवडणुकीच्या रिंगणात असून, त्या प्रचंड बहुमताने निवडून येतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचा पाया हा स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी रचलेला आहे. त्याअनुषंगाने असंख्य निवडणुका आम्ही एकत्रित लढलो असून, त्यात यश आले आहे. आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी २ डिसेंबरपर्यंत महायुती टिकवायची आहे. त्यानंतर निर्णय घेण्यात येणारस असे म्हटले आहे. त्यावर २ डिसेंबरनंतर महायुती टिकवायची की नाही असे त्यांनीच ठरवावं, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. या वेळी माजी आमदार पप्पू कालानी, माजी महापौर मीना आयलानी, माजी उपमहापौर जया साधवानी, माजी नगरसेवक मोहन साधवानी, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, दिलीप गायकवाड, शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, टीओकेचे प्रवक्ता कमलेश निकम, मनोज लासी, नरेंद्र कुमारी ठाकूर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com