बदलापुरात ‘शिंदे वादळ’; हाफ सेंचुरी टीमसह सत्ता राखण्याचा निर्धार”!

बदलापुरात ‘शिंदे वादळ’; हाफ सेंचुरी टीमसह सत्ता राखण्याचा निर्धार”!

Published on

विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार
बदलापूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

बदलापूर, ता. २९ (बातमीदार) ः नगराध्यक्षपदासाठी वीणा म्हात्रे आणि ४९ उमेदवार अशी ‘हाफ सेंच्युरी’ टीम उभी आहे. शहरात शिवसेनेचा विजय निश्चित आहे. शीतल राऊत यांच्या बिनविरोध निवडीमुळे बदलापुरात शिवसेनेचे खाते शुभ संकेतांनी उघडले. त्यामुळे आता विरोधकांचे डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.
येथील हेंद्रेपाडा परिसरातील घोरपडे मैदानात शिवसेनेची (शिंदे गट) सभा झाली. शहराच्या विकासासाठी शेकडो कोटींचा निधी दिला. सिमेंट रस्त्यांसाठी ५०० कोटी, पाणीपुरवठ्यासाठी २४० कोटी, सांडपाणी योजनेसाठी १९० कोटी हा सगळा निधी आपल्या खात्यातून बदलापुरात आला. शिवसेनेचे शहरप्रमुख गुपचूप येऊन निधी घेऊन जातात आणि शहरात कामे उभी करतात, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर, मेट्रो चिखलोलीवरून बदलापूरपर्यंत आणण्याचे काम खासदार श्रीकांत शिंदे करीत आहे. रेड लाइन-ब्ल्यू लाइन पुनर्तपासणीचे काम सुरू आहे. भविष्यातील शिलार, पोशीर धरणाचे आश्वासनही त्यांनी दिले. २६ हजार लाडक्या बहिणींनी मला आशीर्वाद दिलाय. त्यांच्या चार सदस्यांच्या कुटुंबासह विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणारच, असा दावा शिंदे यांनी केला.
--
आमचे-तुमचे वैर नाही
पदाधिकाऱ्यांवर पोलिस प्रशासनाकडून दबाव येत असल्याच्या तक्रारी आहेत. आमचे-तुमचे वैर नाही, सावध राहा, असा थेट इशारा त्यांनी दिला. बदलापुरातील दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी मुख्यमंत्री असताना आरोपीचा करेक्ट कार्यक्रम मीच केला. आरोप करणाऱ्यांना करू द्या. मी कामातून उत्तर देतो, असे सांगत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना चिमटा काढला.
--
आमदारांचे नाव न घेता टीका
इथे कोणीही आप्पा गप्पा मारणार, पुढे कोणीही येऊ देत; निवडून फक्त शिवसेना येणार, अशी टीका आमदार किसन कथोरे यांचे नाव न घेता शिंदे यांनी केली. तसेच काहीजण माझ्याकडून निधी घेऊन जातात; पण माझे नावदेखील घेत नाही, असा टोलाही त्यांनी कथोरेंना लगावला. विकासकामांचा ठोस पुरावा नसताना आरोप-प्रत्यारोपांच्या गप्पा मारत बसणाऱ्यांवर त्यांनी कडव्या शब्दात टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com