पश्चिम महाराष्ट्र व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या तीन धोकादायक व दुर्गम घाटांमध्ये सिसिटिव्ही यंत्रणेची आवश्यकता
पश्चिम महाराष्ट्र व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या तीन धोकादायक व दुर्गम घाटांमध्ये सिसिटिव्ही यंत्रणेची आवश्यकता
महाड, ता. 1(बातमीदार):
दिघी पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटामध्ये काही दिवसांपूर्वी थार जीप दरीत कोसळून झालेल्या अपघातानंतर घाटातील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी, वरंध व आंबेनळी अशा धोकादायक व दुर्गम भागातील घाटांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे.
ताम्हिणी, वरंध व आंबेनळी हे महत्त्वाचे तीन भाग कोकणाला पश्चिम महाराष्ट्राला जोडतात.ताम्हिणी घाटातून पुणे येथे, वरंध घाटातून पुणे ,भोर तसेच पंढरपूर तर आंबेनळी घाटातून महाबळेश्वर , सातारा ,कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची तसेच इतर प्रवासी वाहतूक दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात होत असते. ताम्हिणी घाटामध्ये 17 नोव्हेंबरला अशाच प्रकारे रात्री प्रवास करणारी एक थार दरीत कोसळून सहा जण ठार झाले होते या अपघाताचा तपास तब्बल 48 तासानंतर लागला. त्यामुळे अपघाताचे कारण समजणे व प्रवाशांना वाचवणे शक्य झाले नाही. या घाटामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. 2018 पोलादपूर महाबळेश्वर घाटातील आंबेनळी घाटामध्ये दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून 32 जण ठार झाले होते. या अपघाताने मागील कारणे देखील स्पष्ट झाली नाहीत. वरंध घाटामध्ये सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे या ठिकाणाहून वाहतूक सध्या कमी प्रमाणात असली तरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग जवळचा मार्ग असल्याने येथील वाहतूक ही पूर्वीप्रमाणे वाढणार आहे. या तिनही घाटात अवघड वळणे व खोल दरी असल्याने वारंवार अपघात घडण्याची मालिका सुरू असते.
या ठिकाणावरून जाणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांना व प्रवाशांना या घाटात वाहन अपघातग्रस्त झाले किंवा बंद पडले तर किमान 20 किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूस मधे यंत्रणा उपलब्ध होऊ शकत नाही. या परिसरात मोबाईल नेटवर्क असल्याने मोबाईल यंत्रणा कार्यान्वित नसते .घाटात मोठ्या प्रमाणावर जंगलाचे साम्राज्य असल्याने रात्री अपरात्री कोणतीही प्रकाश व्यवस्था नसल्याने तसेच वाहन दुरुस्तीचे कोणतेही उपाययोजना या तिन्ही मार्गावर अद्याप उपलब्ध नाही .अपघात झाल्यास जखमी प्रवाशांना वैद्यकीय उपचारासाठी किमान 25 किलोमीटर अंतरापर्यंत. प्राथमिक उपचाराची सुविधा नसल्याने या ठिकाणी अपघात ग्रस्त झालेल्या प्रवाशांचे बळी गेल्याच्या घटना देखील यापूर्वी घडल्या आहेत.
परंतु यावर सरकारी पातळीवर व्यापक प्रमाणात प्रयत्न होताना दिसत नाहीत. कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात व पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची सीसीटीव्ही यंत्रणेमार्फत नोंद झाली तर कोणत्या वाहनाला अपघात झाला हे तातडीने सुरक्षा यंत्रणेला अवगत होईल याकरता या घाटांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी अशी प्रवासी वर्गांची मागणी आहे.
हे तिनही घाट अत्यंत दुर्गम व अवघड आहेत. कोणतीही दुर्घटना घडल्यास संपर्क साधणे कठीण होते.त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्या करावी. त्यामुळे तातडीने मदत मिळणे शक्य होईल - सुनील जाधव( सामाजिक कार्यकर्ता)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

