राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीसाठी ३,४६,४६६ दावे दाखल

राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीसाठी ३,४६,४६६ दावे दाखल

Published on

तडजोडीसाठी ३,४६,४६६ दावे दाखल
राष्ट्रीय लोकअदालतीतील प्रकरणांची संख्या आणखी वाढणार
ठाणे शहर, ता. ३० (बातमीदार) ः ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत पक्षकारांना आपापसात तडजोड करून प्रकरणांचा निपटारा करता येणार आहे. अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांनाही या न्यायालयात तडजोड करून समाधानाने न्याय मिळवून घेता येणार आहे. या वर्षाच्या शेवटच्या लोकअदालतीत आतापर्यंत तीन लाख ४६ हजार ४६६ हून अधिक प्रकरणे तडजोडीसाठी दाखल झाली असून, यात आणखी मोठी वाढ होणार आहे. मागील अदालतीत (१३ सप्टेंबर) ५५ हजार ९८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली होती.
न्यायालयात दाखल होऊ पाहणारी आणि दाखल झालेली प्रकरणे तडजोडीतून निकाली काढता यावी, यासाठी प्रत्येक तीन महिन्यांनी न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत भरविण्यात येते. त्यात दोन्हीकडील पक्षकारांना आपापसात तडजोड करून न्याय मिळवून घेता येतो. यात दोन्हीकडील पक्षकारांची त्यामधून कायमची सुटका होते. शिवाय न्यायालयाचा मोठा भारदेखील कमी होतो. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालत १३ डिसेंबरला होणार असून, या अदालतीत आपासात तडजोड करून प्रकरणे सोडवून घेण्यासाठी २४ नोव्हेंबर या कालावधीत दोन लाख ९६ हजार ३२५ दाखल पूर्व आणि ५० हजार १४१ प्रकरणे दाखल झाली आहेत. ६ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय लोकअदालतीत पक्षकारांना प्रकरणे दाखल करता येणार आहेत. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी या अदालतीत आपापली प्रकरणे दाखल करून लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश रवींद्र पाजणकर यांनी केले आहे.

कोणती प्रकरणे सोडवता येणार?
दाखल पूर्व प्रकरणे - वैवाहिक व इतर दिवाणी प्रकरणे, धनादेश, बँक कर्ज, वीज-पाणीबिल, कामगारांचे वाद, करवसुली, अपासात तडजोडपात्र प्रकरणे
प्रलंबित प्रकरणे - अपासात तडजोड करण्याजोगे फौजदारी, मोटर अपघात नुकसानभरपाई, वैवाहिक वाद, भूसंपादन, विद्युत आणि पाणीबिल, सेवाविषयक पगार, भत्ते, सेवानिवृत्तीचे फायदेविषयक प्रकरणे, महसूल, भाडे यांसारखे दिवाणी, वहिवाट हक्क, मनाई हुकुमाचे दावे, विशिष्टपूर्व बंध कराराची पूर्तताविषयक वाद आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com