मतदारांची नावे तपासण्यासाठी विशेष मतदार सहाय्यता केंद्र

मतदारांची नावे तपासण्यासाठी विशेष मतदार सहाय्यता केंद्र

Published on

मतदार यादीतील नावे तपासण्यासाठी विशेष सहाय्यता केंद्रे
मिरा-भाईंदर महापालिकेकडून सुविधा
भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदार यादीतील आपले नाव आणि प्रभाग क्रमांक सहज शोधता यावा, यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने विशेष मतदार सहाय्यता केंद्रे सुरू केली आहेत. पालिकेचे मुख्य कार्यालय तसेच सर्व प्रभाग कार्यालये येथे ही केंद्रे कार्यरत झाली आहेत. विधानसभा मतदार याद्यांची प्रभागानुसार वर्गीकरण करण्यात आल्यामुळे मतदारांना नाव शोधण्यात येणारी अडचण दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रातील कर्मचारी मतदारांना त्यांचे नाव नेमके कोणत्या प्रभागात आणि मतदार यादीत समाविष्ट आहे, हे शोधून देण्यास याचा उपयोग होणार आहे. या केंद्रांमुळे मतदारांना त्यांच्या नावाची नोंदणी योग्य प्रभागात झाली आहे की नाही, याची खात्री करता येणार आहे. मतदार सहाय्यता केंद्राव्यतिरिक्त नागरिकांना राज्य निवडणूक आयोगाच्या mahasecvoterlist.in या संकेतस्थळावर नावानुसार किंवा मतदार ओळखपत्र क्रमांकानुसार माहिती तपासण्याची सोपी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध आहे. या संकेतस्थळाची थेट लिंक पालिकेच्या mbmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत
प्रशासनिक माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख ३ डिसेंबर आहे. ज्या नागरिकांची नावे चुकीच्या प्रभागामध्ये समाविष्ट झाली आहेत, त्यांनी या मुदतीत हरकती व सूचना दाखल करणे आवश्यक आहे. या हरकती व सूचना मिरा-भाईंदर महापालिका मुख्य कार्यालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या कर विभागात प्रत्यक्ष स्वीकारल्या जातील. नागरिकांनी या मतदार सहाय्यता केंद्रांना भेट देऊन मतदार यादीतील आपले नाव आणि प्रभाग क्रमांक तपासून घ्यावा आणि आवश्यक असल्यास मुदतीत हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com