मुलीच्या आत्महत्येप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : प्रेमसंबंध ठेवण्यासाठी आणि सतत बोलण्यासाठी दबाव टाकल्यामुळे, तसेच वारंवार त्रास दिल्यामुळे तळोजा भागात राहणाऱ्या एका १६ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तळोजा पोलिसांनी शुक्रवारी (ता. २८) मृत मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार, १९ वर्षीय तरुणावर विनयभंग, आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच पॉक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी प्रणय हा दहिसर येथील नागाव गावाचा रहिवासी असून, तो बारावीमध्ये शिकतो. तो मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्यामुळे तो ऑगस्टपासून तिचा सतत पाठलाग करत होता. तसेच तो मुलीवर सतत बोलण्यासाठी आणि संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता, मात्र मुलगी त्याला नकार देत होती. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये प्रणयने शाळेबाहेर मुलीला शिवीगाळ करत मारहाण केली होती. सततच्या या छळवणुकीमुळे मुलगी मानसिक तणावाखाली आली होती. याच तणावातून पीडित मुलीने १२ नोव्हेंबर रोजी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या पालकांना घरामध्ये एक चिठ्ठी सापडली होती. ही चिठ्ठी आरोपीनेच दिल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. तळोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण भगत यांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

