राज्य कबड्डी अजिंक्य निवड चाचणीत पालघर कुमारी गट अव्वल

राज्य कबड्डी अजिंक्य निवड चाचणीत पालघर कुमारी गट अव्वल

Published on

राज्य कबड्डी निवड चाचणीत पालघर कुमारी गट अव्वल!
पुणे येथे झालेल्या ५२व्या स्पर्धेत १० गुणांची आघाडी घेत अजिंक्यपद
पालघर, ता. ३० : पुणे, खडकी येथे २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ५२ व्या राज्य कबड्डी अजिंक्य निवड चाचणी स्पर्धेत पालघर जिल्ह्याच्या कुमारी गटाने अजिंक्यपद पटकावले.
पालघरच्या कुमारी गटाने अंतिम सामन्यात पुणे पिंपरी चिंचवड संघाला कडवी झुंज देत १० गुणांची आघाडी घेत विजय साकारला आणि या निवड चाचणी स्पर्धेत पालघर जिल्ह्याचे नाव कोरले. या सामन्यात पिंपरी चिंचवड संघाने ४३ तर पालघर संघाने ५३ गुण घेतले. या निवड चाचणीनंतर राज्यातील २६ जिल्ह्यांतून राष्ट्रीय पातळीसाठी चौदा खेळाडूंची निवड केली जाणार आहे आणि यात पालघरच्या खेळाडूंचा समावेश निश्चित मानला जात आहे. पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण राऊत आणि उपाध्यक्ष वलकेश राऊत यांनी या यशाबद्दल संघाचे अभिनंदन केले. त्यांनी प्रशिक्षक आरती यादव, व्यवस्थापक दीक्षा परब, राष्ट्रीय कबड्डीपट्टू कुणाल यादव, तुकाराम तोडकर, सुधीर शिंदे आणि धरम चिल्लर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेल्या कठोर प्रशिक्षणामुळे आणि उत्कृष्ट रणनीतीमुळेच हे विजेतेपद मिळाल्याचे सांगितले.

पालघर विजयी संघातील खेळाडू
पायल बेलकर, सुजाता लंहागे, प्रिन्सिया मानकर, अक्षता पाटील, हनी सोलामुट्टू, ग्रीष्मा वनारसे (कप्तान), आरती महाकाल, जागृती मोर, संजना भोईर, काजल भोईर, अंजली यादव, साक्षी शर्मा, किमया ध्वन, जानवी पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com