बदलापुरात तणावाची परिसीमा
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण?
थेट उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार
बदलापूर, ता. ३० (बातमीदार) ः समर्थनगर- रमेशवाडी भागात शिवसेना (शिंदे गट) मुरबाड विधानसभा उत्तर भारतीय अध्यक्ष शेरसिंग यांना भाजप उमेदवार किरण बाविस्कर आणि प्रणिता कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या हिंसक घटनेनंतर शेरसिंग हे थेट बदलापूर येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेला पोहोचले आणि त्यांनी स्टेजवरच आपली तक्रार मांडली. उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर शेरसिंग यांनी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली.
निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीमधीलच दोन पक्षांत हा हिंसक प्रकार घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी (ता. २९) दुपारी बॅरेज रोड परिसरात ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र भाजप उमेदवारांनी या आरोपांना प्रत्युत्तर देत वेगळीच बाजू मांडली आहे. शेरसिंग यांनी भाजप समर्थकांना धमकावले होते. ते स्पष्टीकरण मागण्यासाठी गेले असता, शेरसिंग पळून जाण्याच्या घाईत होते. या धावपळीत त्यांची दुचाकी घसरून ते पडले आणि त्यांना अपघातात दुखापत झाली. जाणीवपूर्वक भाजपला बदनाम करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे किरण बाविस्कर आणि प्रणिता कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
दोन्ही पक्षांचे दावे पूर्णपणे परस्परविरोधी असल्याने मारहाण झाली, की अपघात, यावर संभ्रम निर्माण झाला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

