डोंबिवलीत महिला किक बॉक्सिंग लीगचा थरार

डोंबिवलीत महिला किक बॉक्सिंग लीगचा थरार

Published on

डोंबिवलीत महिला किक बॉक्सिंग लीगचा थरार
३०० पेक्षा अधिक विद्यार्थिनींचा दमदार सहभाग
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० ः भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि भारतीय खेल प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने खेळो इंडिया ‘अस्मिता’ अंतर्गत आयोजित महिला किक बॉक्सिंग लीग डोंबिवलीत उत्साहात पार पडली. सेंट होली एंजल शाळेत भरलेल्या या स्पर्धेत महिला सामर्थ्य, जोश आणि खेळाडूपणाचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळाला.
स्पर्धेचे उद्‍घाटन आंतरराष्ट्रीय सायकलपटू विनोद पूनमिया यांच्या हस्ते झाले. यावेळी किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार, किक बॉक्सिंग स्पोर्ट्स वेल्फेअर फाउंडेशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शुभम मिश्रा आणि शाळेचे मुख्याध्यापक बिजॉय उम्मेन उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना शुभम मिश्रा म्हणाले, या रिंगमध्ये उतरलेल्या मुली या फक्त स्पर्धक नाहीत, तर देशाच्या उज्ज्वल भविष्यातील आधारस्तंभ आहेत. ‘अस्मिता’च्या माध्यमातून प्रत्येक मुलीने स्वतःची शक्ती ओळखून पुढे यावे. खेलो इंडिया व्यासपीठ महिलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून देते. खेळाने मिळवलेला आत्मविश्वास त्यांना आयुष्याच्या प्रत्येक लढ्यात विजयी करेल. खेलो इंडियाचा हा मंच महिलांना जागतिक स्तरावर चमकण्याची संधी देईल. क्रीडा संस्कृतीला बळ देणारा आणि महिलांना आत्मसंरक्षणासोबतच व्यावसायिक खेळात उतरण्यासाठी प्रोत्साहित करणारा हा अस्मिता लीगचा उपक्रम डोंबिवलीमध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला, असे त्यांनी म्हंटले आहे.

३०० हून अधिक स्पर्धक
या एकदिवसीय लीगमध्ये ठाणे जिल्ह्यातील तब्बल ३०० हून अधिक विद्यार्थिनी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक सामन्यातील किक, पंच आणि लढण्याच्या आत्मविश्वासाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या सहभागाला या लीगने नवी दिशा मिळाल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com