दुबार मतदारांच्या शोधासाठी वसई-विरार महापालिकेची पथके
दुबार मतदारांच्या शोधासाठी पथके
विरार, ता. ३० (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच होणार आहे. एकूण २९ प्रभागांत ११५ जागांसाठी ही निवडणूक पार पडेल. प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत ११ लाख २७ हजार ६४० मतदार आहेत. यासाठी १ जुलै २०२५ पर्यंतची विधानसभा मतदार यादी गृहीत धरली आहे. या यादीमध्ये विविध प्रभागांत सुमारे ५२,३७८ दुबार मतदार आढळले आहेत. त्यांना वगळण्यासाठी महापालिका प्रशासनाने पथके नियुक्त करून शोध मोहीम सुरू केली आहे. निवडणुकीच्या आरक्षण सोडतीवर आतापर्यंत ३४९ हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यांची पडताळणी लवकरच केली जाईल, असे सहाय्यक आयुक्त (निवडणूक) विश्वनाथ तळेकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मतदार याद्यांवरील हरकती/सूचना नोंदवण्याची मुदत राज्य निवडणूक आयोगाने ३ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १० डिसेंबर रोजी, तर अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.
------------------
२९ प्रभाग
- ११,२७,६३७ एकूण मतदार
- ५,२५,७५० महिला मतदार
- ६,०१,७४१ पुरुष मतदार
- १४६ इतर मतदार
- ५२,३७८ दुबार मतदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

