कोची येथे मत्स्य प्रक्रिया आणि मार्केटिंग प्रशिक्षण

कोची येथे मत्स्य प्रक्रिया आणि मार्केटिंग प्रशिक्षण

Published on

मत्स्य व्यावसायिकांना कोची येथे
मूल्यवर्धित उत्पादनाचे प्रशिक्षण
वाणगाव, ता.३० (बातमीदार) :
पालघर जिल्ह्यातील २० युवा मत्स्य व्यावसायिकांचे प्रशिक्षण केरळ राज्यातील कोची येथील राष्ट्रीय मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान संस्थेत २६ ते २८ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. या प्रशिक्षणात वसई, सातपाटी, मुरबे, येथील मत्स्य व्यावसायिक सहभागी झाले होते. कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल आणि प्रकल्प संचालक, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण पार पडले. फिश कटलेट, फिश रोल, फिश पिकल, फिश करी, फिश मिक्स आणि प्राँन्स चटणी, मसाला यांसारख्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांचे प्रात्यक्षिक दाखवण्यासोबतच सौर आणि इलेक्ट्रिक ड्रायर वापरून उच्च गुणवत्तेचे ड्राय फिश उत्पादन तसेच धुरीकरणाच्या (Smoking) आधुनिक तंत्राने उत्पादन टिकवणे व बाजारमूल्य वाढवणे, यावर मार्गदर्शन करण्यात आले.
मूल्यवर्धित उत्पादनामुळे पालघर जिल्ह्यामध्ये मत्स्य उद्योगाला एकात्मिक व रोजगारनिर्मितीक्षम उद्योग म्हणून विकसित करण्याची मोठी क्षमता असल्याचे प्रशिक्षणार्थींना जाणवले. प्रशिक्षणादरम्यान स्वच्छता, सूक्ष्मजीव नियंत्रण, पाण्याची गुणवत्ता आणि उपकरणांचे निर्जंतुकीकरण यावर मार्गदर्शन करण्यात आले.
------------------
प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून स्थानिक स्तरावर प्रक्रिया उद्योग उभारता येतील, महिलांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी वाढू शकतील, उत्पादनातील नुकसान टाळता येईल.
- डॉ. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com