डहाणूचा पॅराॲथेलिट सचिन तांडेलला राज्यस्तरावर तीन सुवर्णपदके
डहाणूचा पॅराॲथलिट सचिन तांडेलला राज्यस्तरावर तीन सुवर्णपदके
पालघर, ता. ३० : पालघर जिल्ह्यातील डहाणू नरपडचा पॅराॲथलिट सचिन हरेश्वर तांडेल याने भालाफेक, गोळाफेक आणि लांब उडी या तिन्ही क्रीडा प्रकारांत उत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर तीन सुवर्णपदके प्राप्त केली. त्याच्या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रात पालघर जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे. पाचवी राज्यस्तरीय पॅराॲथलेटिक्स स्पर्धा कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ क्रीडा संकुलात २८ ते २९ डिसेंबरदरम्यान पार पडल्या. राज्य पॅरालिंपिक स्पोर्टस् असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सचिनने एफ ४२ प्रकाराच्या गटातील भालाफेक स्पर्धेत ४१.३७ मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. गोळाफेक आणि लांब उडी या क्रीडा प्रकारांतही त्याने सुवर्णपदक पटकावले. सचिन याने राष्ट्रीय खेळाडू होण्यासाठी प्रचंड मेहनत आणि संघर्ष करून आपली क्रीडा कारकीर्द घडवली आहे. तो मासेमारी व्यवसाय, गावात दुकान चालवून आपल्या क्रीडा साहित्य आणि इतर गरजा पूर्ण करतो. दररोज सकाळ-संध्याकाळ नियमित सराव करीत आहे. आंतरराष्ट्रीय ॲथलीट स्नेहल संजय राजपूत यांच्या मार्गदर्शनाचा त्याला फायदा होत आहे. सचिनला घडविण्यात पालघर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने आणि डहाणू इ-लाइट जिमचे फिट्नेस ट्रेनर प्रकाश भुजबळ, सागर जाधव व हर्ष मनोज बारी यांचे योगदान आहे. सचिनच्या यशाबद्दल जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
------------------
सचिन तांडेलच्या या सुवर्ण कामगिरीमुळे पालघर जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे. तो आंतरराष्ट्रीय स्तराच्या पंगतीतला खेळाडू आहे. सचिनच्या माध्यमातून पालघरला पॅराऑलिंपिक पदक मिळेल अशी खात्री आहे.
- सुहास व्हनमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर जिल्हा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

