अखंड वाचनयज्ञात साहित्य भारतीतर्फे नाना पालकर काव्यवाचन सत्राचे आयोजन

अखंड वाचनयज्ञात साहित्य भारतीतर्फे नाना पालकर काव्यवाचन सत्राचे आयोजन

Published on

नाना पालकर काव्यवाचन सत्राचे आयोजन
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने ५ व ६ डिसेंबर रोजी नाना पालकर काव्यवाचन सत्राचे आयोजन करणयात आले आहे. अखंड वाचनयज्ञ उपक्रमांमध्ये साहित्य भारती, कोकण प्रांततर्फे नाना पालकर काव्यवाचन सत्र शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी ६ वाजता बालक मंदिर संस्था येथे होणार आहे.
कवी व लेखक नारायण हरी पालकर ऊर्फ नाना पालकर हे संघाचे प्रचारक होते. त्यांनी डाॅ. हेडगेवार यांचे चरित्र लिहिले. ‘चला निघूया सरसावोनी देशाच्या उद्धरणी’, ‘यशाने दुमदुमवू त्रिभूवने’ या सारखी गीते लिहिली. ‘उठावणी’ हा त्यांचा मराठी श्लोकांचा संग्रह आहे. ‘भगवा ध्वज व इस्रायल छळाकडून बळाकडे’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.
अक्षरमंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी बालक मंदिर संस्था, पै फ्रेंड्स लायब्ररी, रेगे दीक्षित सायन्स अकादमी, जोशी फायनान्शिअल सर्विसेस, खर्डीकर क्लासेस, कोकण मेवा योजक यांचे सहकार्य लाभणार आहे. नाना पालकर काव्यवाचन सत्रासाठी प्रवीण देशमुख, डॉ दिनेश प्रताप सिंग, शामसुंदर पांडे, रुईता सपकाळे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित राहणार आहेत. या सत्राचे संयोजन नंदा कोकाटे यांनी केले आहे. अखंड वाचनयज्ञामधील सर्व सत्रासाठी प्रवेश विनामूल्य जास्तीत जास्त वाचनप्रेमींनी उपस्थित राहून वाचनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संस्था सचिव हेमंत नेहते यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com