बदलापुरात वाढत्या वाहनचोरीच्या घटना
बदलापुरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ
दोन वेगवेगळ्या प्रकरणांची नोंद
अंबरनाथ, ता. ३० (वार्ताहर) : बदलापूर परिसरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्हीप्रकरणी बदलापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
बदलापूर पूर्व शिरगाव परिसरातील अमित पार्क येथे राहणारे रिक्षाचालक संदीप गोपीप्रसाद शर्मा (वय २७) यांची रिक्षा (एमएच-०५ डीझेड-४८५२) कर्जत हायवे परिसरातून चोरीस गेली. शर्मा यांनी १८ नोव्हेंबरला रात्री १० वाजता रिक्षा ॲसेस मोटारसमोर उभी केली होती; मात्र २५ नोव्हेंबरला सायंकाळी रिक्षाची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुमारे ५० हजार रुपये किमतीची ही रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असून, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत शिर्के पुढील तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत विनायक रामचंद्र पवार (वय ४६, रा. चामटोली, बदलापूर) यांची सफेद रंगाची दुचाकी (एमएच-०५- सीएस-१३३७) चोरीला गेली. शुक्रवारी (ता. २८) दुपारी ३.४५ ते रात्री ११.३० या वेळेत कुळगाव-बदलापूर नवीन नगरपालिका गेटजवळ ही चोरी झाली. अंदाजे १० हजार रुपये किमतीचे हे वाहन भिंतीला लॉक करून ठेवले असतानाही चोरट्याने ते पळवून नेले. या प्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात आला असून, शिवाजीनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत. बदलापूर परिसरात वाढत असलेल्या वाहनचोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस तपास अधिक गतिमान करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

