हिरवे आच्छादन वाचवण्याचे मानावापुढे आव्हान- मेधाताई पाटकर

हिरवे आच्छादन वाचवण्याचे मानावापुढे आव्हान- मेधाताई पाटकर

Published on

बुलेट ट्रेन हा विनाशकारी विकास
भूमिपुत्रांना विस्थापित करण्याचा डाव ः मेधा पाटकर

पालघर, ता. ३० (बातमीदार) ः जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली अनेक प्रकल्प सुरू आहेत. स्थानिक भूमिपुत्रांना विस्थापित करणे त्यांच्या
उपजीविकेची साधने हिरावून घेणे, त्यांच्यासाठी कोणत्या सोयीसुविधा निर्माण न करता वाऱ्यावर सोडून देणे, असे प्रकार पालघर जिल्ह्यात सुरू आहेत. हे सर्व धनिकांसाठी सुरू आहे. गरिबासाठी सरकारने काय केले, हे सांगावे, असा प्रश्न ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी उपस्थित केला आहे.
आदिवासी समाजोन्नती सेवा संस्था पालघर आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या शनिवारी (ता. २९) सफाळे येथील वेढी येथे मेधा पाटकर आल्या होत्या. या वेळी त्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्प, एक्स्प्रेस वे मुळे बाधित डोंगर, नद्या, घरे यांची पाहणी केली. देशभरात विकासाच्या नावाने जे प्रकल्प होत आहेत. ते निसर्गाला, माणसाला आव्हान निर्माण करणारे आहेत. महाराष्ट्रातील तब्बल २,६०० गावे संपल्याचे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. टेंभीखोडावे येथे दोन वर्षांपूर्वी बांधलेले घर बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे कोसळले. ठेकेदार कंपनीने घराला लोखंडी टेकूचा आधार दिल्याचे उदाहरण त्यांनी दिले. आदिवासी समाजोन्नती सेवा संघाचे अध्यक्ष सागर सुतार, सुजय मोरे, साधना वैराळे, ज्योती केळकर यांनी विविध प्रश्नांवर आपले विचार मांडले. या वेळी संजय भुयाळ, सुजय मोरे, आशुतोष शेलार, किशोर गिराणे, प्रफुल्ल मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
---
पर्यावरणावर आघात
वाढवण बंदर, मुरबे बंदर यासह विनाशकारी प्रकल्पांचा पर्यावरणावर आघात होऊन संघर्ष वाढला आहे. मच्छीमार ५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपासून आंदोलनात आहेत. जनप्रतिनिधी, जन संघटना आंदोलनापर्यंत जातात. सरकारने संवेदनशीलता दाखवण्याची गरज आहे. विवाद अधिक पुढे जाऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला. सरकार म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, पंचायत राज, संविधान सरकारी यंत्रणेचा भाग चारही स्तंभांचे नाते असते. बेकायदा पुढे जाणाऱ्या प्रकल्पांना जनवादी लोक आंदोलने रोखून धरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नर्मदा आंदोलनातील ३२ हजारांहून अधिक घरांना २२४ फुटी घरे दिली. पंचवीस वर्षे होऊनही घर व घराची जमीन नावे झालेली नाही. तीच परिस्थिती चंद्रनगर, नवी दापचारी तेथील धरण प्रकल्पग्रस्तांची आहे. पालघर जिल्ह्यात वाढवण, मुरबे येथे सागरी पर्यावरणाला परिणाम करणाऱ्या प्रकल्पाची जनसुनावणी दुसऱ्या शहरात होते. हे कायद्याला धरून नसल्याचे मेधा पाटकर यांनी सांगितले. कोणताही पक्ष सत्तेवर असो, जनवादी, समाजवादी, समता व न्यायवादी विकास करणे कर्तव्य आहे.

--
फोटो ओळ
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर लोकांशी संवाद साधताना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com