अभिनेते धर्मेंद्र देओल यांच्या स्मरणार्थ शोकसभा; कला-क्षेत्रातील मान्यवर उपस्थित
अभिनेते धर्मेंद्र देओल यांच्या स्मरणार्थ शोकसभा; कला-क्षेत्रातील मान्यवर उपस्थित
तुर्भे, ता. ३० (बातमीदार) ः ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांच्या स्मरणार्थ शोकसभा सुनील गावस्कर मैदान, सीबीडी, तुर्भे येथे आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने पार पडली. या शोकसभेत कला, समाज आणि स्थानिक स्तरावरील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या, ज्यांनी धर्मेंद्र देओल यांच्याप्रती आपली श्रद्धांजली व्यक्त केली.
शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी धर्मेंद्र देओल यांच्या समृद्ध अभिनय कारकिर्दीवर प्रकाश टाकला. त्यांचे साधे स्वभाव, भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान, सामाजिक जाणीव आणि मानवी मूल्यांची बांधिलकी यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. अनेकांनी त्यांच्या अभिनयातील विविध पैलूंवर आणि समाजातील योगदानावर भाष्य करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, धर्मेंद्र देओल हे खरे ही-मॅन होते, ज्यांनी त्यांच्या अभिनयातून अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या योगदानाची आठवण सदैव स्मरणात राहील. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी दोन मिनिटे शांतता पाळून दिवंगत अभिनेते यांना आदरांजली अर्पण केली. शोकसभेत माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, माजी भाजप जिल्हाध्यक्ष सी. व्ही. रेड्डी, जाट समाज अध्यक्ष धरमपाल कलवानिया, हरियाना वेल्फेअर असोसिएशन अध्यक्ष बलबीर सिंह चौधरी, भारतीय योग संस्थान जिल्हा प्रधान जनार्दन सिंह, पंजाब कल्चरल वेल्फेअर असोसिएशन चेअरमन गुरुबक्ष सिंह यांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

